प्रिय मित्र,

वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनचा पहिला वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.गिरीश कुलकर्णी (स्नेहालय, अहमदनगर), श्री.शिवशंकर बरसकाळे (बी.डी.ओ. बुलढाणा), व श्री. सुनील चव्हाण (डॉ.एम.एल.ढवळे मेमोरिअल ट्रस्ट, पालघर) हे मान्यवर उपस्थित होते. पुण्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी व्हिडीओ स्वरूपात आपला संदेश व शुभेच्छा उपस्थितांना पोचवल्या.

 

कार्यक्रमाची सुरवात ‘समतेच्या वाटेनं तू बंधन तोडीत याव’ या सुरेल गीतगायनाने प्रवीण सिंधू भीमा, अमोल शैला सुरेश, घनश्याम येनगे, व उमेश जाधव या तरुणांनी केली. तसेच स्नेहल जाधव व प्रवीण डोणगावे यांनी सुत्रासंचालन केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात वोपाच्या कामामागील प्रेरणा, विचार व मागील वर्षभराचे कार्य याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे  प्रकाशन करण्यात आले.  (इथे वाचा)

 

 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सर्व जेष्ठ मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला व वोपाच्या कामाबद्दल आपले मत व शुभेच्छा व्यक्त केल्या. 

 

त्यानंतर वोपा गावपातळीवर ज्या शिक्षक व इतर कार्यकर्त्यांसोबत काम करते त्यातील काही लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री.अश्विन भोंडवे यांनी सर्वांचे आभार मानले.

दुसऱ्या सत्राचा व प्रमुख कार्यक्रमाचा शेवट सामुहिक राष्ट्रगीत गायनाने झाला.

 

कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील रंगदृष्टी थीएटर व ड्रामालय स्कूल ऑफ एक्टींग या संस्थांनी, प्रसिद्ध् लेखिका महाश्वेतादेवी यांच्या ‘चेटकीण’ या कथेचे अभिवाचन केले तसेच जागतिक कीर्तीचे लेखक चेकोव्ह लिखित ‘द ड्राउनड मॅन’ या लघु नाटकाचा प्रयोग सादर केला.

काही इतर क्षणचित्रे:

धन्यवाद!

Spread the love

Subscribe for future blog post updates!


2 Comments

 1. Pramila

  Hi,
  Congratulations for the team and best wishes for your bright future…
  It’s my pleasure I was part of this beautiful ceremony and learned much important knowledgeable things which are really useful in life..
  Once again congratulations…

 2. Sagar Bendre

  Hello,
  Heartiest congratulation to VOPA for such a successful year long journey and very best for future endeavour 🙂 Thank you for such a detailed report with links & videos…..Through this virtually I could enjoy the ceremony.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + three =