सुजाण पालकत्वाची पाच तत्वे – संगोपन भाग १
मी एका मैत्रिणीकडे रहायला गेले होते, रात्रीच्या जेवणानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. तिचा तीन वर्षांचा मुलगा कबीर अजूनही झोपला नव्हता आणि घरभर भांबावल्यासारखा फिरत होता. जणू काही आपण आता हरवलो आहे असं त्याला वाटत असावं. तितक्यात माझी मैत्रीण म्हणाली की, “आम्ही त्याला डिस्टर्ब नाही करत, आमचा विश्वास आहे की कबीर त्याच्या झोपेचं वेळापत्रक ठरवत असावा