तर आज की ताजा खबर पासून आपण सुरवात करूया. लॉकडाउन येत्या ३ मे पर्यंत वाढवलं आहे. आपण सगळ्यांनीच आपल्या-आपल्या घरातच राहूया. जेणेकरून आपल्या घरातले आपल्या गावातले लोक कोरोनापासून सुरक्षित राहतील.

पालकांनो आणि मुलांनो आजची गोष्ट तुम्हा दोघांसाठी सुद्धा आहे. आजची गोष्ट आहे निषादची. निषाद नावाचा एक खूप गोड, हुशार मुलगा होता. निषादची आई त्याच्या लहानपणीच गेली. निषादला त्याच्या आत्याने सांभाळल. निषादची आत्या त्याला खूप गोष्टी सांगायची. एके दिवशी काय झालं माहितीये..

निषादला घरात बसून बसून कंटाळा आलेला. आणि शाळेला सूद्धा सुट्टी होती. तेव्हा लॉकडाउन किंवा कोरोना असं काहीही नव्हतं. घरात कंटाळा आला म्हणून निषाद अंगणात आला. तर त्याला दिसलं की, त्याच्या आजूबाजूला राहणारे काही मित्र पकडापकडी खेळत होते. तुम्ही खेळता नं आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत पकडापकडी? अगदी तशीच. निषादला वाटलं चला हे भारी झालं. आता मीपण जाऊन खेळतो. निषाद त्यांच्यात खेळायला गेला. निषाद खेळायला आलेला पाहून सगळे खेळायचे थांबले. तेवढ्यात निषाद म्हटला, “चला मी देतो राज्य.” त्यावर समीर म्हटला, “नाही नको तू नको.”

मग निषाद म्हटला, “ठीक आहे मग मी पळतो.” निषाद यायच्या आधी अतुल वर राज्य होता. सगळे पळायला लागले. निषाद पण पळत होता. त्याला खूप मज्जा येत होती. पण अचानक निषादच्या लक्षात आलं की त्याला कुणी आऊटच करत नाहीय.  पुढचे १५ मिनिटे निषादने मुद्दाम आऊट व्हायचा प्रयत्न केला. पण अतुल त्याच्या समोरून जात होता तरीही त्याला आऊट करत नव्हता.

अतुल असं का करत असेल बरं? निषाद त्यांच्यात खेळायला आलेला अतुल ला आवडलं नव्हतं का? बरं अतुलला ते आवडलं नसेल. तर काय कारण असेल त्यामागे? बघा न आपल्यासोबत असं कुणी केलं तर किती राग येईल न आपल्याला? अस सगळे खेळताय आणि आपल्याला एकट्याला खेळू नाही दिलं आपल्याच मित्रांनी. आपल्याला एकटं पाडलं तर कसं वाटेल न? किती वाईट वाटेल! आपलेच मित्र आपल्याशी असं वागले तर?

निषादला काही कळत नव्हतं. अतुल असं का वागतोय. निषादने त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तर अतुल त्याला म्हटला, “ए काळ्या आम्हाला नाही खेळायचं तुझ्यासोबत. तुला हात लावला तर आम्ही पण काळे व्हायचो.” हे ऐकून निषादला खूप खूप  वाईट वाटलं. त्याला एकदम रडायलाच आलं. तो पळत-पळत त्याच्या घरात गेला. आणि झालेली सगळी घटना त्याने आत्याला सांगितली.

आत्याने निषादला जवळ घेतलं. त्याला शांत केलं. निषाद म्हटला, “आत्या मी काळा का आहे? काळं असणं चूक असत का?” आत्या म्हटली, “नाही रे बाळा. प्रत्येक रंग हा सुंदर च असतो. म्हणजे बघ हा निसर्गात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या /वस्तूंचा  रंग पांढराच असता तर? ”

निषादने कल्पना केली. तो म्हटला “ए….नाही ग आत्त्या किती बोरिंग. घर पांढर, भिंती पांढऱ्या, झाडे पंढरी, फुले पांढरी, आकाश , पाणी शाळा पुस्तके , मी….सगळ पांढर. नको नको! बापरे!!! आत्या कल्पना सूद्धा नको वाटते. ”

त्यावर आत्या म्हटली, “निषाद निसर्गातल्या प्रत्येक व्यक्तीला महत्व असत. मग ते वेगळे रंग असलेली , वेगळ्या धर्माची, वेगळ्या जातीची माणसं असू देत किंवा गरीब श्रीमंत असू  दे किंवा काळी-गोरी असू दे किंवा मुलगा-मुलगी असू दे. निसर्गात वेगवेगळ्या रुपात असं वेगळेपण आहे ते स्वीकारलं पाहिजे. रंगाप्रमाणे कामाचं सूद्धा तसचं आहे. कुठलं च काम छोट नाही. सगळ्यांनी फक्त ऑफिस मध्ये जाऊन च काम केलं असत तर आपल्यालासाठी शेतात अन्न पिकलं नसतं, शाळेत कुणी शिकवायला नसत, आपल्याकडे कचरा न्यायला कुणी आलं नसतं. काय केलं असत आपण मग?”

आत्याच बोलण ऐकून निषादच्या लक्षात आलं. “अरे हो की, आत्या म्हणतेय ते बरोबर आहे आणि आपले मित्र जे वागतंय ते चुकीच” आत्या ने सांगितलेली गोष्ट निषाद ने आपल्या मित्रांना सांगायची ठरवली.

मित्रांनो आपल्या वर्गात देखील काही मुले जाड असतात. काही बारीक असतात. काही मुले गरीब तर काही श्रीमंत असतात. काही काळे तर काही गोरे असतात. काही हिंदू तर काही मुस्लीम असतात. पण सगळी आपलीच मित्र-मंडळी ना? निषाद सारखं आपल्यासोबत झालं तर किती वाईट वाटेल आपल्याला. मग आपण अतुल सारखं आपल्या मित्रांसोबतपण कुणाला त्याच्या दिसण्यावरून, रंगावरून , जाड असण्यावरून चिडवायला नको हो न? आपल्या मित्रांना आपल्यामुळे वाईट नको वाटायला न? तुमच्या वर्गात किंवा आजूबाजूला असं कुणी करत असेल तर त्यांना निषादच्या आत्या ने सांगितलेली गोष्ट नक्की सांगा.

गोष्ट कशी वाटली. तुम्हाला असा कुठला अनुभव आला का? आम्हाला नक्की लिहून पाठवा.

तुमची,

ऋतुजा व संपदा ताई

7666818341

Spread the love

Subscribe for future blog post updates!


6 Comments

 1. Bhakti Shukre

  खूप सुंदर लिहिले आहे ऋतुजा . खरे तर या छोट्या छोट्या गोष्टी मुलाना लहानपणीच शिकवायला पाहिजे आणि ही गोष्टीमधून शिकवणे खूप चांगले आहे.
  या गोष्टीमध्ये काढलेले चित्र पण खूप सुंदर काढले आहे

 2. कराळे चंद्रकला

  खूप छान गोष्ट होती. मला ती खूप आवडली कोणालाही त्याच्या रंगावरून कमी लेखू नये. या गोष्टी मुलांना लहानपणीच शिकवल्या पाहिजे. या गोष्टींमध्ये काढलेले चित्र बोलके दिसते.

 3. Madane Kaveri

  खरंतर या गोष्टीतून खूप काही घेण्यासारखे आहे. लहान वयातच मुलांना योग्य ती शिकवण द्यायला पाहिजे. वर्णभेद ,जात भेद ,श्रीमंत-गरीब हे भेद करू नये हे लहान वयात शिकवला गेला पाहिजे. खरंच ऋतुजा ताई आणि संपदा ताई ही गोष्ट खूप छान आहे.

 4. Sathe Mangal

  गोष्ट खुपच छान आहे. आपल्या सभाेवताली घराघरात, सामाजिक,राजकीय सर्वत्रच भेदभाव हाेताना दिसतात. लहान मुले माेठयांचे आचरण करत असतात. आज समाजात पद, पैसा, धर्म यावरून भेदभाव केला जाताे. आपण माेठयांनीच आपल्या वागणुकीत बदल केला तर तीच माेठी शिकवण मुलांसाठी असेल.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + eleven =