कैसे हो छोटे और हमारे बडे दोस्तलोग?

आज तुम्हाला भेटायला धम्माल करणारे, गावोगावी जाऊन तुमच्या सारख्या छोट्यांना मस्त गोष्टी सांगणारे, तुमच्या सारखेच खूप खूप मस्ती करणारे ताई-दादा आले आहेत. दादाच नाव आहे कल्पेश आणि ताईच नाव आहे प्रतिक्षा. तुम्हाला अजून एक भन्नाट गोष्ट सांगू का? बघा म्हणजे विचार करा हा. काही लोकं डॉक्टरच काम करतात. काही पोलीस असतात. काही लोकं कंपनी मध्ये काम करतात. काही भाजीपाला विकतात. काही आपल्याकडे कचरा गोळा/वेचण्याच काम करतात. काही पूर्ण घर/आपल्याला सांभाळण्याच काम करतात..आपल्या आईसारखं. असे वेगवेगळे लोकं वेगवेगळी काम करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार थोडक्यात. तसचं आपले कल्पेश दादा आणि प्रतिक्षा ताई ‘गोष्ट सांगण्याचं’ काम करतात. तुम्ही म्हणाल काहीपण हा ऋतुजा ताई!

पण मी खरंच सांगतेय. हे ताई-दादा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गोष्ट सांगायचं काम करतात. गोष्ट सांगणे हाच त्यांचा रोजगार आहे. तुम्हाला बघायचं का ताई-दादांना?

कल्पेश आणि प्रतिक्षा..एक गोष्ट सांगताना


हे दोघे संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये गावांमध्ये जाऊन मुलांना आणि शिक्षकांना जगभरात प्रसिद्ध असलेल्या छान छान गोष्टी सांगतात तेही अगदी वेगळ्याच प्रकारे..


बर हे सगळ झालं. ताई-दादा नी आपल्याला एक भन्नाट गोष्ट पाठवली आहे. ही मूळ गोष्ट इंग्रजी मधली आहे पण आपल्यासाठी ती मराठीमध्ये प्रतिक्षा ताईने लिहिली आहे. आणि कल्पेश दादा ने मस्त चित्र काढली आहेत. तुम्हाला वाचायला खूप मज्जा येईल. गोष्ट कशी वाटली? हे  सांगायला विसरू नका.


काय मग मोठं होऊन ताई-दादा सारखं ‘गोष्ट सांगणारं’ व्हायचं का? कसली गम्मत आहे न? हे सगळ ते कसं करतात याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील. म्हणजे यासाठी त्यांनी काय शिक्षण घेतलं. हे काम त्यांना कसं सुचलं? का करावसं वाटलं? ते इंजिनिअर किंवा डॉक्टर का नाही झाले? असे काहीही प्रश्न! तर आम्हाला ते नक्की पाठवा. आम्ही ते ताई-दादांना नक्की पाठवू. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यायला लावू.

 

तुमची,

ऋतुजा ताई

7666818341

ताई-दादा च फेसबुक पेज

Spread the love

Subscribe for future blog post updates!


15 Comments

  1. Karale Chandrakala

    कशासारखंतरी’ ही गोष्ट वाचायला खूप छान आहे. त्याच प्रमाणे त्यामध्ये वसिरला चित्र काढायला खूप आवडतं परंतु त्याला हुबेहूब चित्र काढता येत नसतं. त्याचा भाऊ त्याला हसतो म्हणून तो चित्र काढायचा जास्त सराव करतो पण त्याला असे वाटते कि मला चांगले चित्र काढता येत नाही म्हणून तो चित्र काढण्याचे सोडून देतो पण त्याचवेळेस त्याच्या बहिणीने त्याने चुरगळलले कागद तिच्या खोलीमध्ये भिंतीला चिटकवलेले पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला व तो पुन्हा चित्र काढायला लागला. यावरून असे सिद्ध होते कि कोणतेही चित्र काढले तरी ते कशासारखंतरी दिसतेच. या गोष्टीतून त्या मुलाचा आत्मविश्वास तसेच चित्र काढण्याची आवड चित्र काढता काढता चित्रातून कविता, त्याच्या मनातील भावना या चित्रांद्वारे व्यक्त होतांना दिसतात. एकंदरीत या गोष्टीतून शिकण्यासारखे खूप आहे मला ही गोष्ट खूप आवडली.

  2. Pravin Santosh Dongawe

    Interesting aahe. बोलायला आवडेल दोघांसोबत पण.

  3. Rutuja Mahendra Jeve

    Really a very beautiful story. Thanks a lot, Pratiksha and Kalpesh

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =