सध्या बऱ्याच पालकांशी आणि काही छोट्या मुलांशी बोलणं होत आहे. एकंदरीत मुलं भयंकर बोअर झाली आहेत घरात आणि पालकांना दिवसभर मुलांसोबत नेमकं काय करायचं? हे कळत नसल्यामुळे मुलांवर सारख्या सूचनांचा भडीमार होतोय. थोडक्यात पालक आणि मुले यांची एकमेकांवर चिडचिड, राग असं सगळं चित्र आहे. पालकांना व मुलांना आम्ही काही दिवसांच्या अंतरांनी एक लेख पाठवू. ज्यामध्ये कधी मुलांसोबत घरात करायच्या वेगवेळ्या कृती, त्यासंबंधी गरजेनुसार काही चित्रे, कधी online links, कधी कोडे, कधी गोष्टी, कधी गाणी अशा अनेक गोष्टी असतील. जेणेकरून पालकांना फार विचार न करता, सहज दिवसातला काही वेळ मुलांसोबत सत्कारणी लावता येईल. 

मुलांनो कोरोना मुळे शाळांना तर सुट्ट्या आहेच, तुमची पण धम्माल चालू असणार. कोणी चित्र काढत आहेत ,वेगवेगळे उपक्रम करीत आहेत, विज्ञानाचे विविध प्रयोग करण्यात गुंग आहेत, कुणी गणित सोडवण्यात मग्न आहे. कोणी वेगवेगळे उपक्रम करीत आहेत.

तुम्हाला एक मजेशीर प्रश्न विचारू?

तुम्हाला दुर्बीण माहिती आहे का? जी डोळ्यावर लावल्याने दूरवरच्या गोष्टी जवळ दिसतात? त्या दुर्बिणीचा शोध कुणी लावला माहितीये?

तर आज आपण याच दुर्बीण आणि लंबकाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ गॅलिलिओ ची गोष्ट ऐकणार आहोत.

मुलांनो गॅलिलिओ चे पूर्ण नाव गॅलिलिओ गालिलि. इटलीच्या पिसा  शहरात इ.स. १५६४ मध्ये त्याचा जन्म झाला. मुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपला अभ्यासातला रिकामा वेळ गॅलिलिओ कसं घालवत होता माहित आहे का? तुम्ही तुम्हाला मिळालेला रिकामा वेळ कसा घालवता रे? खेळून? टी.व्ही. पाहून? घरच्यांना त्रास देऊन?

तर गॅलिलिओ फावळ्या वेळात गणिताच्या वर्गांना हजर राहत असे. आणि त्याला डॉक्टर व्हायचे होते परंतु ‘रीची’ नावाच्या शिक्षकाच्या गणिताच्या शिकवणीने त्याला भुरळ घातली आणि त्याने गणिताच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पिसा येथे विश्वविद्यापीठात अभ्यास करताना सगळ्या मुलांना प्रार्थनेसाठी जावे लागे.

 

ते ऐकताना गॅलिलिओचे लक्ष हेलकावे घेणार्‍या झुंबराकडे गेले आणि त्याचे विचार चक्र सुरु झाले. अशाच विचारांमधून त्याने लंबकाचा नियम शोधून काढला तो शोध म्हणजे, “लोंबत्या वस्तुच्या झोक्याला लागणारा वेळ वस्तूला बांधलेल्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असतो. त्या वस्तू च्या वजनावर किंवा झोक्यावर आंदोलनाच्या कमी -जास्त प्रमाणावर अवलंबून नसतो”  

मुलांनो हा शोध ज्या वेळी गॅलिलिओ ने लावला त्या वेळी तो कॉलेज मध्ये शिकणारा फक्त १७ वर्षाचा विद्यार्थी होता. आहे की नाही आश्चर्य?

मुलांनो पृथ्वी वर कोण कोणते पर्वत आहेत बर ? सर्वात मोठा पर्वत कोणता बरं? त्याही पेक्षा चंद्रा वरील पर्वतांची ऊंची जास्त आहे हे माहित आहे का तुम्हाला? नाही ना? तर लक्षात ठेवा गॅलिलिओ ने आपल्या दुर्बिणीतून चंद्रावरचे डोंगर दर्‍या आणि विवरे यांचे निरीक्षण केले. तेव्हा त्याला ही धक्कादायक माहिती मिळाली. गॅलिलिओ ने खगोलशास्त्रात आपल्या संशोधनाने खूप प्रगती केली होती परंतु त्याच्या आयुष्याची दुखद गोष्ट म्हणजे त्या डोळ्यांनी संपूर्ण जगाला दुर्बिणीतून निरीक्षणाची शक्ति दिली. सर्वसामान्य लोकांना आकाश निरीक्षणाची सोय करून दिली. गोडी लावली त्याच गॅलिलिओ चे डोळे काम करेनासे झाले. ज्या डोळ्यांनी सर्वात प्रथम चंद्रा वरचे खड्डे पाहिले , डोंगर पाहिले , ज्या डोळ्यांनी गुरुच्या चंद्राचे शोध लावले त्याच गॅलिलिओ चे डोळे गेले. पण मित्रांनो हार मावेल तर तो गॅलिलिओ कसा?

त्याने वैज्ञानिक निरीक्षण करण्या साठी मदतनीस घेतले. आणि अभ्यास पूर्ण केला. शेवटपर्यंत गॅलिलिओ काम करत होता. किती भन्नाट आहे न? आपल्याकडे असलेल्या याच दुर्बिणीच्या माध्यमातून आपण कितीततरी भन्नाट गोष्टी पाहू शकतो. वेगवेगळ्या दुर्बिणीचा वापर करून खगोलशास्त्रज्ञ आकाशात दिसणाऱ्या चंद्र, छोटी चांदणी, मोठी चांदणी, ग्रह यांचे देखील निरीक्षण करतात. त्यांचा अभ्यास करतात. आहे की नाही गम्मत? किती तरी संकट आली तरी, न डगमगता त्याने आपले संशोधन , आपले कार्य सुरू ठेवले.  

घरच्या घरी एक टेलिस्कोप कशी बनवायची याचा अरविंद गुप्तांचा हा व्हिडीओ नक्की पहा.

मुलांनो कशी वाटली गॅलिलिओ ची गोष्ट? गोष्ट वाचून काय वाटलं तुम्हाला? तुमच्याकडे आहे का दुर्बीण? सध्या घरी असलेल्या दुर्बिणीद्वारे तुम्ही काय काय पाहिलं आम्हाला नक्की सांगा.

 

यास्मिन सय्यद

स्नेहालय स्कूल, अहमदनगर

Spread the love

Subscribe for future blog post updates!


1 Comment

  1. Anita Vinay Rao

    I want to join VOPA.Please tell me procedure to become a member.Thank you.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 14 =