युट्युबवर ‘जन्नत की हुर’ नावाचा एक व्हिडिओ आहे. एक मौलवी आपल्या भक्तांना सांगतात की, “आज तुम्ही कुरूप बायको, नट्या, प्रेयसी, वेश्या (गंदी, मैली-कुचैली औरतें) यांच्या नादी लागून अल्लाला विसरून जाता, असे करू नका, जर तुम्ही जन्नत मध्ये गेलात तर तुम्हाला अशा अशा मुली ‘वापरायला’ मिळतील की…..म्हणून आत्ता थोडी कळ काढा, त्रास सहन करा आणि पुढे जन्नतला जायची तयारी करा.” जन्नत चे वर्णन करताना मौलवी म्हणतात तुम्हाला १०० पुरुषांचे पुरुषत्व प्राप्त होईल, या सुंदर मुली तुम्हाला फक्त पहायला नाही तर त्यांच्याशी ‘हवं ते’ करायला मिळतील इ. स्त्रियांना स्वर्गामध्ये काय मिळेल याबद्दल मात्र दुर्दैवाने ते काही बोलत नाहीत. बहुतांश धर्मगुरुंप्रमाणे इथे हे मौलवी एक प्रकारचा विशेष युक्तिवाद वापरत आहेत जो आपल्या तार्किक विचारांना खीळ घालून आपल्याकडून हवे ते करून घेण्यात कामी येतो.

काही वर्षापूर्वी मी बँगलोरला असताना अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. मी काही दिवस त्रास अंगावर काढला पण नंतर नाईलाजाने मी एका लोकल डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला बराच वेळ तपासलं, त्यांना नक्की रोगाच निदान झालंय की नाही असा विचार माझ्या मनात आला, तेवढ्यात त्यांनी कागदावर औषधे लिहायला घेतली. “अँटिबायोटिक्स लिहून देत आहे, तीन दिवस घेऊन पहा.” आणि निघताना मला ते म्हणाले कि, “सुरवातीला जरा काळ दुखणं वाढू शकेल, नंतर त्रास कमी होईल”. आणि डॉक्टर म्हणाले तसच झालं, माझी तब्येत अजून खालावली. तीन दिवसांनी मी डॉक्टरांना फोन करून सांगितलं, ते म्हणाले की डोस वाढवून घ्या. तरीही मला बर वाटल नाही, म्हणून शेवटी मी बँगलोरमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी अपेंडिक्सच निदान केलं आणि लगेच ऑपरेशनही करून घेतलं. “तुम्ही इतके दिवस वाट का पाहिली, आधी का नाही आलात?” ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी विचारलं. मी म्हणालो की, “आधीच्या डॉक्टरांनी सागितलं होत की बर होण्याच्या आधी तुमचा त्रास वाढेल, आणि तसच होत होत, त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.” डॉक्टर म्हणाले, “तुम्ही ‘It will get worse before it gets better’ या युक्तिवादाला बळी पडलात. खरतर आधीच्या डॉक्टरांनी तुमच्या आजाराच निदान केलंच नव्हतं.”

हा युक्तिवाद समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहू: एका कंपनीचा मालक सतत होणाऱ्या तोट्यामुळे चिंतेत होता. त्यांची उत्पादने विकली जात नव्हती. शेवटी त्याने दहा लाख रुपये पगार देऊन एका नामवंत सल्लागाराची नेमणूक केली. सल्लागाराने आधी कंपनीचा अभ्यास केला आणि म्हणाला, “तुमच्या विक्री विभागाची बाजाराबाबतची समज कमी आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. तुमचा ब्रँड लोकांपर्यंत  पोहोचला नाहीये. अशा प्रकारच्या नाजूक परिस्थितीमधून मी तुम्हाला परत उभ करू शकतो. पण हे एका रात्रीत होणारे काम नाही. संयम ठेवावा लागेल. आधीचा काही काळ आपण अधिक तोट्यात जाऊ.” मालकाने सल्लागाराने सांगितल्या प्रमाणे बदल केले. आणि पहिल्या वर्षी आधीच्या वर्षीपेक्षा विक्री अधिक कमी झाली. दुसऱ्या वर्षी देखील कंपनी तोट्यात गेली. सल्लागाराने अनुमान सांगितल्याप्रमाणेच सगळं होत होतं. पण तिसऱ्या वर्षीदेखील तोटा झाल्यानंतर मालकाने सल्लागारला बडतर्फ केले.

“It will get worse before it gets better” हा आपण आधीच्या लेखात पाहिलेल्या पुष्टीकरण पुर्वाग्रहाचाच एक प्रकार आहे. जर परिस्थिती खालावत राहिली तर सल्लागार म्हणणार की मी सांगितल्या प्रमाणेच होत आहे आणि जर अनपेक्षितपणे परिस्थिती सुधारलीच तर ग्राहक खुश होणार आणि सल्लागार फुशारकी मारणार. काहीही झाले सल्लागाराचाच फायदा.

समजा तुम्ही जर देशाचे पंतप्रधान आहात आणि देश कसा चालवायचा हे तुम्हाला नक्की माहित नाही किंवा तुमचे इतर छुपे हेतू आहेत, तर तुम्ही लोकांना सांगू शकता की, “पुढील काही काळ आपल्यासाठी कठीण असणार आहे.”, “अच्छे दिन आने वाले हैं”, “सत्तर वर्षांची घाण साफ करायला आपल्याला वेळ तर लागणारच ना?” किंवा “मला फक्त ५० दिवसांचा कालावधी द्या, तेवढे दिवस त्रास सहन करा मग सगळ ठीक होईल”. ‘नाजूक काळ’, ‘पुनर्व्यवस्था’, ‘सफाई’ अशा शब्दातील युक्तिवाद ऐकल्यावर लोक या काळात परिस्थिती बिघडणार यासाठी आधीच तयार होतात, आणि जरी परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी हे बरोबरच सुरु आहे असा समज करून घेतात.

थोडक्यात मुद्दा असा की, जेव्हा पण तुम्ही “It will get worse before it gets better”  अशा पद्धतीचे वाक्य ऐकाल तर तुमचे कान टवकारले गेले पाहिजे. पण हे काहीवेळा खरं देखील असतं, जस की आपली करिअर मधील प्रगती किंवा एखादी नवीन कंपनी कशी प्रगती करेल याबाबत हा युक्तिवाद लागू पडेल. पण अशा वेळी देखील होणारी प्रगती तुलनेने लगेच दिसते, आपल्याला प्रगतीचे टप्पे ठरवता येतात, आणि प्रगतीचे हे टप्पे स्पष्टपणे आणि पडताळून पाहता येतात म्हणून भविष्यातील स्वर्गावर नव्हे तर आता घडणाऱ्या गोष्टींवर नजर असू द्या.

– Based on the ‘Art of thinking clearly’ – Rolf D. Amazon link.

प्रिय वाचक, कमेंट मध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


1 Comment

 1. Newton

  I understood that at times people can be fooled by believing in the idea that “good times are going to come after few days of hardships”. Thanks for explaining by two examples and the demonetization days example.

  But I coulnd’t understood why many people believe in this. Is this behavior encoded into our genes or we learn this from our society or are there personal events which make us believe on this idea.

  So, Is opening a start-up going through difficult times (working more than normal, relationships being affected) to later see the
  benefits of those difficult days, a fallacy? Based on your person experience, is it not true?

  Thanks for sharing about the book also “The Art of Thinking Clearly”

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + three =