तुम्ही किती जगणार या प्रश्नाचे उत्तर,  तुम्हाला वाटेल तुमचे आरोग्य कसे आहे, किती चांगल्या आरोग्य सुविधा तुम्हाला मिळतात, तुम्ही किती शिकला आहात, तुम्हाला किती पैसा मिळतो, या सर्व गोष्टींवर कदाचित अवलंबून असावं पण भारतात तुम्ही कुठल्या जातीत जन्म घेतला आहे यावरून देखील ठरत की तुमचं सरासरी आयुष्यमान काय असेल.

इकोनॉमिक अँड पोलिटीकल विकली (EPW) या प्रख्यात जर्नलमध्ये एक शोधनिबंध (Caste, Religion, and Health Outcomes in India, 2004-14) प्रकाशित झाला. ज्यात संशोधकांनी मानवी आरोग्यावर सामाजिक घटकांचा प्रभाव आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. एनएसएसओ च्या २००४ आणि २०१४ साली झालेल्या ६० व ७१ व्या फेरीतील कुटुंबांच्या सर्वेमधून जी माहिती गोळा केली गेली त्या माहितीवर आधारित विश्लेषण या शोधनिबंधात मांडण्यात आले आहे. लोकांचे मृत्यूसमयी किती वय होते व आरोग्यविषयक काय अडचणी होत्या यांवर अधिक भर देण्यात आला आहे.

या अभ्यासानुसार भारतातील वंचित सामाजिक घटकातील लोक लवकर मृत्युमुखी पडत आहेत, म्हणजेच तुम्ही कमी वयातच मरण्याचा धोका अधिक आहे जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये जन्म घेतला असेल.

जीवनस्तर, भौगोलिक स्थान, उत्पन्न, अशा गोष्टींना संशोधनात गृहीत धरून देखील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, मुस्लीम यांचे आरोग्यविषयक स्थान ‘उच्चजातीय उच्चवर्णीय अमुस्लीम’ लोकांच्या तुलनेत बरेच वाईट दिसून आले.

Click on the graph to view details

अधिक माहितीनुसार:

ज्या भागात अनुसूचित जाती, जमाती व OBC मुस्लीम बहुसंख्य आहेत तिथे शासनातर्फे आरोग्यसुविधावर कमी खर्च केला जातो.

२९ % आदिवासी व १६% दलितांना साध्या डॉक्टर व दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत.[i]

केवळ ४२% आदिवासी आणि ५७% दलित मुलांना लसीकरण सुविधा मिळते.[ii]

या संशोधनातून स्पष्ट होते की मुलभूत आरोग्य सुविधा, शासनाकडून दुर्लक्ष, वेगळी वर्तणूक इ गोष्टी जातीव्यवस्थेमुळे कशा व किती प्रभावित होतात. लोकांचे आरोग्य केवळ त्यांच्या सवयींवर व वागणुकीवर अवलंबून नसून ते ज्या सामाजिक परिस्थितीत जगतात, जगवले जातात त्यावरही अवलंबून आहे आणि ही सामाजिक परिस्थिती वेगवेगळ्या सामाजिक घटकांसाठी अतिशय असमान व अन्यायी पद्धतीने उभारली जाते.

उदा. ओरिसामध्ये नुकतेच येऊन गेलेल्या फानी वादळाने बरीच जीवित व वित्त हानी झाली. या वादळातून बचावासाठी जी शेल्टर उभारली गेली होती त्यामध्ये जीव वाचवण्यासाठी आसरा घेण्यास गेलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या अनेक लोकांना अटकाव केला गेला.[iii]

उदा. अनुसूचित जमातीमधून पुढे येऊन शिकणाऱ्या डॉ.पायल तडवी या विद्यार्थिनीस प्रचंड जातीभेद, मानसिक व शारीरिक छळ, इ. प्रश्नांना सामोरे जावे लागले, ज्याला बळी पडून तिने आत्महत्या केली.[iv]

पूर्ण शोधनिबंध येथे वाचा.

[i] See Sengupta, J and D Sarkar (2007): “Discrimination in Ethnically Fragmented Localities,” Economic & Political Weekly, Vol 42, No 32, pp 3313–22.

[ii] See Guha, Ramachandra (2007): “Adivasis, Naxalites, and Indian Democracy,” Economic & Political Weekly, Vol 42, No 32, pp 3305–12.

[iii] See: https://www.epw.in/journal/2019/21/commentary/multipurpose-cyclone-shelters-and-caste.html

[iv] See: https://thewire.in/caste/payal-tadvi-harassment-caste-discrimination

 

Spread the love

Subscribe for future blog post updates!


4 Comments

 1. Gaurang

  इंटरेस्टिंग लेख / आलेख आहे हा.. नक्कीच विचार करायला पाहिजे ह्यावर. लेख / आलेखात काही गोंधळ वाटत आहेत ज्यावर अजून खोलात जाव लागेल असा दिसतंय… लेखात काही संदर्भ दिले आहेत जे पूर्णपणे खरे नाही आहेत. See Sengupta, J and D Sarkar (2007): “Discrimination in Ethnically Fragmented Localities,” Economic & Political Weekly, Vol 42, No 32, pp 3313–22.ह्या लेखच पूर्ण नाव Discrimination in Ethnically Fragmented Localities: A Study on Public Good Provision in West Bengal जो पश्चिम बंगाल साठी आहे ज्याला पूर्ण भारतासाठी जन्रलाइज केला आहे असा दिसतंय. आलेखात उच्चवर्णीय मुस्लीम लोकांची life expectancy OBC muslims पेक्ष कमी आहे हे जरा विचित्र वाटत आहे.2014 भारतातील नागरिकांचे average Life expectancy ६८ वर्ष होती मग लेखातल्या आलेखात कुठल्याच जातीची average Life expectancy ६० च्या वर का नाहीय 🤔

  • Admin

   Hi,
   1. This research is based on certain data set only, as mentioned in 2nd para of the article. Every research has scope and limitations.
   2. OBC Muslims and upper class Muslims – the researchers put the findings based on actual selected data. So we can’t deny that for a certain set of data it might be true. (Minor difference in both life expectancies)
   3. About Bengal and its generalization…EPW and data of NSSO both are considered very highly in research field. We didn’t bother to verify the data again.. 😅
   4. But then again the sample size is always questionable considering India and it’s diversity.
   5. So we personally take such findings with a pinch of salt.. But the message and trends are very clear, We are ok with little variation in numbers.
   6. To understand this topic, you may also look for book and research named ‘WHERE INDIA GOES’ by Dean spears. It has interesting findings corelating health and caste in India.
   7. For this marathi version of article, we have worked on articles in EPW only. It’s good that you have questions but you have to search deeper yourself.

   Keep exploring, keep reading, keep questioning… 🙂
   Thank you!

 2. Gaurang

  धन्यवाद Admin,
  एकूणच हा विषय खूप विचार प्रवर्तक होता त्यामुळे अजून माहिती मिळवणे सुरु केले आहे. NSSO चे दोन्ही reportस ज्यावर EPW चा लेख आधारित होता हे देखील मिळाले आणि अभ्यास चालू केला आहे. (प्राथमिक दर्शनी तरी ह्या दोन्ही रेपोर्त्स मध्ये ६०थ आणि ७१स्त रेपोर्त्स मध्ये धर्माधारित data मिळत नाही. अजून खोदकाम केल्यावर मिळेल बहुदा. पण काहीवेळा विषय सेन्सेश्नालीज करण्यासाठी facts ची मोडतोड किंवा सोयीने अर्थ लावणे आजकाल खूपच नित्याचे झाले आहे तसाच हा प्रकार असावा असे वाटते.

  • Admin

   नक्कीच, त्या अभ्यासातून जर काही चुकीचे घडले आहे असे समोर आले तर EPW ला ते कळवता येईल.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 2 =