रॉल्फ डोबेली यांच्या आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्वग्रहांची माहिती दिली आहे. या पुर्वाग्रहांना आपण सगळेच कळत नकळत बळी पडतो आणि त्यामुळे आपले बरेचसे निर्णय चुकतात सुद्धा किंवा ते कुठल्या तरी पुर्वग्रहाला बळी पडून घेतलले असतात. अश्याच अनेक पूर्वग्रहापैकी एक म्हणजे ‘fallacy base-rate neglect’. म्हणजे नेमकं काय ते आपण पाहू.

अर्पिता ही एक छोटे केस असणारी भारतातील एक महिला आहे, तिला सुफी संगीत ऐकायला खूप आवडतं. तर आता सांगा यापैकी कुठली शक्यता जास्त असेल?

१. ती एक सामान्य गृहिणी आहे

२. ती संगीत विशारद असलेली, कॉलेजमध्ये शिकवणारी प्रोफेसर असेल.

आता बऱ्याच लोकांना या प्रश्नाचं उत्तर “ती संगीत विशारद असलेली प्रोफेसर असेल” असं वाटेल. पण भारतात गृहिणींची संख्या ही संगीत विशारद प्रोफेसर महिलांपेक्षा नक्कीच बऱ्याच पटींनी जास्त आहे. पण तरी आपल्याला दुसरी शक्यता का वाटली असेल? यालाच शास्त्रज्ञ ‘fallacy base-rate neglect’ असे म्हणतात.

दुसरं उदाहरण पाहू.

समजा एखाद्या माणसावर चाकूने हल्ला झाला तर कुठली शक्यता जास्त असेल? की तो हल्ला करणारा माणूस अट्टल दरोडेखोर असावा की एक मध्यमवर्गीय भारतीय? तो मध्यमवर्गीय भारतीय असला पाहिजे कारण दरोडेखोरांच्या संख्येपेक्षा मध्यमवर्गीय लोकं नक्कीच जास्त आहेत.

रोजचं उदाहरण बघा. स्वयंपाक म्हणजे फक्त बाईने करायची गोष्ट किंवा बाईच काम असचं मानलं जातं पण तसा विचार केला तर लक्षात येईल की जगभरात असणाऱ्या करोडो हॉटेल्स मधील स्वयंपाकी हे पुरुष आहेत.

बिसनेस मध्ये असणाऱ्या लोकांना तर हे तंतोतंत लागू पडेल. कितीतरी लोक वेगवेगळ्या परिषदेत वेगवगळ्या बिजनेसच्या भन्नाट कल्पना सादर करत असतात. त्यांच्या कल्पना ऐकून वाटतं की हीच पुढची गुगल कंपनी असेल. पण आपण आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की जगभरात सुरु होणाऱ्या स्टार्टअप पैकी फक्त २०%  कंपन्या तग धरतात तर मग जागतिक मार्केट मध्ये खरंच किती कंपन्या टिकून राहत असतील हा प्रश्नच आहे. याचं उत्तर जवळजवळ शून्य आहे.

अमेरिकेतील सगळ्यात मोठे बिसनेसमन ‘वॉरेन बफे’ सांगतात की ते बायोटेक कंपन्यांमध्ये का गुंतवणूक करत नाहीत. कारण त्यांच्या मते ‘किती बायोटेक कंपन्या डॉलर्स मध्ये नफा कमवतात? अगदीच नगण्य.’

आता बफे साहेबांनी उपलब्ध असणाऱ्या माहितीचा नीट विचार करून निर्णय घेतला, फक्त वाटलं म्हणून नाही. म्हणजेच बफे साहेब ‘fallacy base-rate neglect’ ला बळी पडले नाहीत.

आता समजा तुमच्याकडे एक जुनी कार आहे. जी सतत बंद पडते. आणि तिला सारखं दुरुस्त करावं लागतं. योगायोगाने तुम्हाला तुमची कार विकण्यासाठी एक माणूस मिळाला आणि तुम्हाला बऱ्यापैकी किंमत मिळाली. आता तुम्ही त्यात थोडे पैसे टाकून नवीन कार घ्यायचं ठरवलं.

सध्या मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या २ कार चे पर्याय तुमच्याकडे आहेत. एक म्हणजे ‘सुबारू’ आणि दुसरी ‘फिएट’. आता यापैकी कुठली तरी एका कंपनी ची कर विकत घ्यायची असं तुम्ही ठरवलं. एका ग्राहक अहवालानुसार (consumer report) ‘सुबारू’ च्या ग्राहकांना ‘फिएट’ च्या ग्राहकांपेक्षा मेंटेनन्स चे कमी प्रोब्लेम येतात. आणि तज्ञांनी सुद्धा ‘सुबारू’ च्या कारला जास्त उच्च दर्जाचे ठरवले.

असं सगळं असतांना तुमच्या एका काकांनी, ज्यांच्याकडे सुबारू कार आहे त्यांनी तुम्हाला फिएट घ्यायला लावली कारण त्यांच्या मते ‘सुबारू’ ला त्यांना बरेच प्रोब्लेम आलेत आणि त्यामुळे त्यापेक्षा ‘फिएट’ च चांगला पर्याय असे त्यांनी तुम्हाला सुचवले.

अश्या प्रसंगामध्ये तुम्ही काय कराल?

अश्या प्रकारच्या प्रसंगांमध्ये लोक नेहमीच उपलब्ध असणाऱ्या मूळ माहितीला दुर्लक्षित करून जे वाटत त्या आधारे निर्णय घेत असतात. अश्याच काही प्रसंगांवर कॅनडा च्या एका विद्यापीठाच्या, मानसशास्त्र विभागातील गॉर्डन पेनिकूक आणि वॅलेरी ए. थॉम्पसन या प्राध्यापकांनी त्यांच्या एका संशोधन पेपर मध्ये, काही प्रश्न विचारून एक अभ्यास केला गेला ज्यात असे दिसून आले की लोकं “fallacy base-rate neglect” ला बळी पडतात. याचाच उल्लेख  या अभ्यासात केलेला आहे.

२०१२ मध्ये काही शास्त्रज्ञांनी केलेला हा एक प्रयोग होता,  ज्यामध्ये त्यांनी १००० लोकांसोबत एक चाचणी घेतली. ज्यामध्ये ९९५ नर्स आणि ५ डॉक्टर्स होते. त्यापैकी मोहन नावाचा एक माणूस निवडला जो की ३४ वर्षांचा आहे आणि जो एका खूप सुंदर आणि मोठ्या घरात राहतो. तो खूप छान बोलतो आणि त्याला राजकारणात खूप रस आहे. त्याने त्याच्या करिअर साठी खूप मेहेनत घेतली आहे.

तर मोहन डॉक्टर असेल की नर्स?

या झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की १००० पैकी ९९५ नर्स ही मूळ माहिती उपलब्ध असतांना,  मोहन नर्स असण्याची शक्यता जास्त आहे पण तरीही १००० पैकी फक्त २४% लोकांनी मोहन नर्स असेल ही शक्यता वर्तवली. म्हणजे मोहन डॉक्टर असल्याची शक्यता फक्त ०.५% असूनही आपल्या पुर्वाग्राहाच्या आधारे जास्त लोकांनी मोहन डॉक्टर असल्याची शक्यता वर्तवली.

यावरून आपल्या लक्षात येईल की इतर माहिती किंवा आकडेवारी/fact माहिती उपलब्ध असतांना देखील त्याकडे दुर्लक्ष करून लोकं त्या क्षणाला जे वाटतं किंवा जे त्यांचे पूर्वग्रह आहेत त्याद्वारे निर्णय घेत असतात.

पालकांच्या /मोठ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या पाल्याचं लग्न! आपल्या पाल्यासाठी योग्य जोडीदार मिळावा म्हणून मोठ्यांच्या डोक्यात सारखा खटाटोप आणि सतत विचार सुरु असतात. जितके पर्याय जास्त असतील तितके योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता ही जास्त! बरोबर?

मग असं असतांना देखील आपले मोठे किंवा आपण जोडीदार आपल्या जातीचा/जातीची, आपल्या भागातली (पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश इत्यादी.), आपल्या स्टेटस ला शोभणारा/शोभणारी, इंजिनिअरच किंवा डॉक्टरच असे कितीतरी फिल्टर लावतो. फिल्टर लावलेल्या गटामध्ये आपल्याला जास्त योग्य जोडीदार मिळेल अशीच खात्री आपल्याला वाटत राहते. या वाटण्यावरून घेतलेला निर्णय हा fallacy base-rate neglect ला बळी पडून घेतलेला निर्णय असून यामुळे आपण आपलंच मोठं नुकसान करून घेऊ शकतो. याचे भयंकर परिणाम देखील आपल्याला भोगावे लागू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणजे उदाहरणार्थ समजा रिता जोशी – २७ वर्षांची  इंजिनिअर असणारी पुण्यात राहणारी मुलगी! जिच्यासाठी योग्य जोडीदार निवडायचा आहे. रिता कडे २ पर्याय आहेत. वर सांगितल्या प्रमाणे १. जात, धर्म, स्टेटस वैगरे  यांचा विचार  करून योग्य जोडीदार शोधणे. २. जात, धर्म यांचा सोबत अनेक फिल्टर न लावता जोडीदार शोधणे. आता रिता ने कुठला पर्याय निवडला म्हणजे तिला जास्त योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता जास्त असेल?

आपण सुद्धा रोजच्या आयुष्यात fallacy base-rate neglect ला बळी पडून काही महत्वाचे निर्णय उपलब्ध असणाऱ्या माहितीकडे दुर्लक्ष करून घेतो का?

 

मांडणी – ऋतुजा जेवे

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.

Spread the love

Subscribe for future blog post updates!


6 Comments

 1. Prashant Ramhari Jadhav

  खुप छान लेख आहे…आणी यातून खुप शिकायला पन मिळाल …मराठीत असल्यामूळे समजून पण घेता आल
  …..धन्यवाद

  • Jaydeep Mangesh Patil

   खूप छान लेख अाहे.नवीन काहितरी,विचारांनचा पलीकडे जाऊन केलेला विचार.🙏

 2. सुनिल चव्हाण

  छान झाला आहे लेख. जोडीदार निवडणे सोडून इतर सर्व उदाहरणे पाश्च्यात देशातील आहेत. आपल्या जवळपासची उदाहरणे दिली तर जास्त भिडेल. बाकी VOPA चे लेख अत्यंत वाचनीय आणि नवनवीन माहितीने भरलेले असतात.

 3. निखिल

  खूपच छान आहे. उदाहरण वरून विषय चांगल्या रीतीने मांडला आहे.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × four =