“नाही माझा आवाज इतका पण छान नाही. माझ्यापेक्षा तिला जास्त छान गाणं येतं, मी नाही म्हणणार गाणं.” “तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे”, “ती माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे त्यामुळे तिच सिलेक्ट होणार.” अशी नेहमीच तुलना आपण करत राहतो. याचा खूप वेळा त्रास ही होतो हो ना?

आयुष्यात बाह्य आणि वरवरच्या गोष्टींपेक्षा अंतरंगातील गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. “लोकं कशी वागतात?” या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर अमेरिकेतील सगळ्यात मोठे बिसनेसमेन ‘वॉरेन बफे’ म्हणतात; की हे ज्या-त्या व्यक्ती जवळ असणाऱ्या त्यांच्या गुणपत्रिकेवर अवलंबून आहे.

ती गुणपत्रिका आंतर आहे की बाह्य यावरच सगळ विसंबून आहे. (Inner/outer scorecard).

आता आंतर-बाह्य म्हणजे नेमकं काय?

समजा तुम्ही जगातले सगळ्यात जास्त प्रेमळ आणि लोकांची काळजी घेणारे व्यक्ती आहात आणि इतर लोकांच्या मते तुम्ही अतिशय निष्काळजी आणि अजिबात प्रेमळ नसलेले व्यक्ती आहात; किंवा याउलट तुम्ही निष्काळजी आणि प्रेमळ नसलेले व्यक्ती आहात तरी लोकं तुम्हाला प्रेमळ आणि काळजी करणारे व्यक्ती समजतात. अस होऊ शकत.

“इतरांसोबत आपली तुलना करणे” हा आपला स्वभाव वापरून लोक आपल्याला, आपल्या वागणुकीला हवं तसं वळवू शकतात. ही तुलना बहुतेक वेळा तुमच्यात आणि इतरांमध्ये असते. काही वेळा ही तुलना अनुवांशिक बाबतीत असते. म्हणजे आपण जास्त उंच असावं किंवा इतरांपेक्षा आपले केस जास्त लांब असावे असं वाटणे. पण त्याहीपेक्षा जास्त ते या बाबतीत असते की इतर लोकांना ज्या गोष्टी जमतात त्या आपल्यालाही जमाव्या किंवा ती क्षमता आपल्यात सुद्धा असावी. म्हणजे मायरा तुमच्यापेक्षा चांगल लिहिते किंवा अरबाज तुमच्यापेक्षा जास्त चांगली नाती जपू शकतो. तर काही वेळेला तुलना ही प्रेरणादायी ठरू शकते. पण काही वेळेला ती विनाशकारी देखील ठरू शकते.

तुम्ही ठरवलत तर काहीही होऊ शकता. पण तुम्ही एकाच वेळी सर्वकाही होऊ शकत नाही. जेव्हा आपण तुलना करत असतो, तेव्हा कदाचित आपण एक घोटाळा करत असतो. तो म्हणजे,

इतरांमधल्या सगळ्यात बेस्ट गोष्टीची तुलना कदाचित आपण आपल्यातल्या त्या मानाने सुमार गोष्टीशी करत असतो.

हे असं झालं की माश्याच्या पोहण्याची तुलना त्याच्या झाड चढण्याच्या क्षमते सोबत करणे किंवा डावखुरे असतांना उजव्या हाताने एखादे वाद्य वाजवण्याची तुलना करणे.

 

जरी इतरांच्या तुलनेत आपण जास्त चांगल असावं, असं वाटणं हे नैसर्गिक असलं तरी असं नेहमी तुलना करून आपण स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखून स्वतःच नुकसान तर करत नाही आहोत, हे बघितलं पाहिजे. इतरांबरोबर ची तुलना ही दुसरं तिसरं काही नसून आयती-वायती दुःखाची रेसिपी असते.

 या तुलनेमुळे अजून काय होतं? समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा एखादी गोष्ट जास्त चांगली जमते. या गोष्टी मुळे तुम्हाला त्याच्याबद्दल खूप ईर्ष्या/ jeleousy वाटते आणि मग त्याच्यातली ती चांगली गोष्ट आपल्याला यावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण त्या व्यक्तीला कमी लेखण्यासाठी किंवा त्याला मागे खेचण्यासाठी आपली शक्ती खर्च करत असतो. असं करून स्वतःहून नकारात्मकता ओढवून घेत असतो. “The impact of personal and social comparison information about health risk” या डेव्हिड फ्रेंच यांच्या एका संशोधन पेपर मध्ये या तुलनेमुळे माणसावर होणाऱ्या भावनिक आणि संज्ञानात्मक अश्या नकारात्मक प्रभावाचा आढावा घेतला आहे.

यापेक्षा जर स्वतःची तुलना स्वतःशीच केली की काल मी जे होती/होतो किंवा आज जे आहे त्यापेक्षा उद्या अजून चांगल कसं स्वतःत बदल घडवून स्वतःत सुधारणा करू शकेल. तर यामुळे तुमची शक्ती आणि सगळे प्रयत्न फक्त तुम्हाला स्वतःला अजून चांगली व्यक्ती होण्यासाठीच खर्च होतील आणि ज्याचा तुम्हालाच फायदा होईल. आणि स्वतःला टेन्शन फ्री, आनंदी ठेवण्यासाठी देखील मदत होईल.

आपल्या सगळ्यांसाठी फेसबुकचे सोंग काही नवीन नाही. फेसबुक वर वेगवेगळी लोकं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील रोजच्या घडामोडींच प्रदर्शन करत असतात. कधी आपण इतरांपेक्षा किती सुंदर, फिट आहे त्याचं, कधी आपल्याला इतरांपेक्षा किती जास्त मित्र-मैत्रिणी/ फॉलोअर आहेत याचं, कधी आपल्या मोठ्या पार्टीज चं, कधी आपल्याकडे असणाऱ्या गाडी, बंगला इत्यादी भौतिक गोष्टींच तर कधी आपण इतरांपेक्षा किती जास्त आनंदी आणि सुखी आहोत याचं.

२०१६ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार असे लक्षात आले की फेसबुक सारख्या माध्यमांवर स्वतःची इतरांशी सतत तुलना केल्यामुळे लोकं नैराशेच्या गर्ततेत सापडतात. या सगळ्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना भयंकर मानसिक आजाराला देखील सामोरे जावे लागते. लँकेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी फेसबुक आणि नैराश्यातला दुवा निश्चित करण्यासाठी १५ वर्षांवरील  ३५००० लोकं सहभागी असलेल्या १४ देशांमधील अभ्यासांची तपासणी केली. त्यांना आढळले की वारंवार फेसबुक वापरणारे स्वत: ची तुलना बर्‍याचदा इतरांशी करतात ज्यामुळे ओव्हरथिंकिंग  होऊ शकते. यामुळे, यामुळे नैराश्याच्या भावना उद्भवू शकतात. हे महिला फेसबुक वापरकर्त्यांमध्ये सामान्य आहे.

काही अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की आपल्या फेसबुक मित्रांबद्दल ईर्ष्या वाटणे किंवा आपल्या सामाजिक नेटवर्कमध्ये माजी प्रेयसी/प्रियकर (past girlfriend/boyfriend) परत जोडण्याचा चुकीचा निर्णय घेतल्यास नैराश्याचे धोका वाढू शकते. याव्यतिरिक्त, नकारात्मक सामाजिक तुलना करणे आणि वारंवार नकारात्मक स्थिती कायम पोस्ट करणे देखील औदासिन्याचे अनुमानकर्ते असल्याचे आढळले.

अमेरिकेतील एक मोठे व्यक्तिमत्व आणि बिजनेसमेन चार्ली मुंगर २००७ मध्ये एका कायदा महाविद्यालयाच्या ठिकाणी केलेल्या आपल्या भाषणात चांगलं व्यक्ती बनून अधिक चांगल आयुष्य कसं जगायचं यात सुद्धा इतरांशी तुलना न करता स्वतःशी च स्वतःची तुलना करून चांगल आयुष्य जगण्यासाठीचे संदर्भ देतात.

आता वॉरेन बफे साहेबांनी आंतर आणि बाह्य गुणपत्रीकेबद्दल काय सांगितलेलं ते परत एकदा पाहू. तर लोकांनी त्यांच्या, तुमच्याकडून ठेवलेल्या कित्येक अपेक्षांच्या चष्म्यातून तुम्ही जर स्वतःचे मोजमाप करत असाल. म्हणजेच outer-scorecard तर त्यात तुमच्या नुकसानीपलीकडे अजून काहीही नाही. पण त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या inner scorecard वर लक्ष केंद्रित करून स्वतःमध्ये सुधारणा करत असाल तर स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःसाठी च मोठा धोका निर्माण करण्यापसून तुम्ही वाचाल.

विल्यम हेनरी बिल हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक तसेच जगातील सगळ्यात जास्त यशस्वी व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व. ते काय म्हणतात पाहू. “जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करतात तेव्हा तुम्ही स्वतःचाच अपमान करत असता.”

जगातील अनेक यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशामागचे रहस्य सांगतांना नेहमीच हे नमूद करतात की त्यांनी स्वतःची तुलना इतरांशी न करता ती फक्त स्वतःशी केली आणि त्यामुळे आज ते इतके यशस्वी होऊ शकले. मग आता तुम्हीच ठरवा की इतरांशी तुलना करून उगाच त्रासात आयुष्य घालवायचं की कालपेक्षा आज मी अजून चांगली व्यक्ती कशी होईल या स्वत:च्या प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकायचं?

मांडणी – ऋतुजा जेवे

प्रिय वाचक, खालील कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा. असे लेख मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी जर तुम्ही मदत करू इच्छिता तर जरूर संपर्क करा.

Based on: ‘The danger of comparing yourself to others’ – https://fs.blog/2019/06/comparing-yourself-others/

Spread the love

Subscribe for future blog post updates!


2 Comments

  1. विनोद

    खरच आहे हे सगळ, सगळं वेळ हा तुलना करब्यात जात असतो.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 16 =