नमस्कार, आमच्या बालमित्र-मैत्रिणींच्या पालकांनो. कोरोना मुळे आपल्या सगळ्यांना घरी बोअर होतंय? तुम्हाला माहितीये काल एक गम्मतच झाली. काही दिवसांपासून आमच्याकडे कचरा न्यायला कुणीच आलं नाही. घरभर नुसता घाणेरडा वास सुटला होता. दुध वाला, पेपर वाला, भाजीवाल्या आज्जी कुणीच नाही. थोडा वेळाने माझ्या डोक्यात विचार आला. ही सगळी लोकं काय करत असतील? म्हणजे बघा न आपल्याकडे घरी खायला प्यायला भरपूर गोष्टी आहेत. पाहायला टीव्ही आहे. गेम खेळायला फोन आहे. पण कचरा गोळा करणारे मामा, भाजी विकणाऱ्या आज्जी याचं खूप दिवसांपासून काम बंद असल्यामुळे त्यांच्याकडचे पैसे संपलेत. अहमदनगर व बीड मधील अश्याच काही गरजू कुटुंबांसाठी आम्ही मदत गोळा करतोय. म्हणजे त्यांना सुद्धा घरी जेवण मिळेल व उपाशी रहावं लागणार नाही.

तर पालकांनो आज आपल्या मुलांसोबत एक गम्मत करूया का? तुम्हाला मज्जा वाटली तर तुम्ही सुद्धा ही गम्मत करू शकता.

चला आपल्या माणसांसाठी एक पत्र लिहूया.! आपल्याकडे काम करायला येणाऱ्या ताई/मावशी, ड्रायव्हर मामा, दुध द्यायला येणारे दादा, भाजीवाल्या आज्जी/काकू, माळीदादा, मामा किंवा आपल्याकडे काम करायला येणारं कुणीही यांना एक पत्र लिहूया का? त्यांचे आभार मानूया का? पालकांनो मुलांना पत्र लिहायला तुम्ही देखील मदत करू शकता. नेहमीप्रमणे तुमच्या मुलांची पत्रे आम्हाला फोटो काढून किंवा मुलांकडून वाचून घेऊन त्याचे व्हिडीओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग आम्हाला नक्की पाठवा.

साने गुरुजींनी लिहिलेल्या अश्याच एका पत्राचा नमुना खाली देत आहोत. हे पत्र आधी मुलांना वाचून दाखवून त्यांना वर सांगितल्याप्रमाणे पत्र लिहायला देता येईल.

पालकांनो आणि मुलांनो हा लेख कसा वाटला? जरूर कळवा आणि तुम्हाला आपल्या मज्जा-मस्ती अंकात अजून काय काय मज्जा-मस्ती हवी हे सुद्धा  कळवा. तुम्ही लिहिणाऱ्या पत्रांची आम्ही वाट बघतोय.

तुमची,

ऋतुजा ताई

Rutumj9893@gmail.com

 

Spread the love

Subscribe for future blog post updates!


Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 2 =