तुमची जात ठरवते तुम्ही कधी मरणार!

तुम्ही किती जगणार या प्रश्नाचे उत्तर,  तुम्हाला वाटेल तुमचे आरोग्य कसे आहे, किती चांगल्या आरोग्य सुविधा तुम्हाला मिळतात, तुम्ही किती शिकला आहात, तुम्हाला किती पैसा मिळतो, या सर्व गोष्टींवर कदाचित अवलंबून असावं पण भारतात तुम्ही कुठल्या जातीत जन्म घेतला आहे यावरून देखील ठरत की तुमचं सरासरी आयुष्यमान काय असेल. इकोनॉमिक अँड पोलिटीकल विकली (EPW) या

Read More

नियंत्रण भ्रम – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१३

रोज सकाळी आठ वाजता, ‘लाल टोपी’ घातलेला एक माणूस एका चौकात उभं राहून आपल्या डोक्यावर असलेली लाल टोपी जोरजोरात हवेत भिरकावत असे. एक दिवस तो असं करत असतांना एका पोलिसाने त्याला पाहिलं आणि विचारलं, “तू रोज असं हवेत टोपी भिरकावून काय करतोस?”तो माणूस म्हणाला, “मी इथून जिराफ हाकलतोय”. त्यावर पोलीस त्याला म्हणाला, “पण इथे तर

Read More

आवडीचा पूर्वग्रह – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१२

मला लस्सी नाही आवडायची कधी.. मित्र नेहमी आग्रह करायचे पण मी नाही म्हणायचो किंवा टेस्ट केली तरी वाईटच लागायची. पुढे कॉलेजात असताना, मला शाळेत आवडणाऱ्या एका मुलीशी आमची मैत्री झाली, आम्ही सगळे जेवायला सोबत गेलो तेव्हा तिने आग्रहाने मला लस्सी ऑफर केली, नेहमी नाही-नाही म्हणणारा मी, ती लस्सी प्यायलो, तेही कुरकुर न करता.. सोबतचे मित्र

Read More

समूहविचार – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०११

तुम्ही कधी ऑफिस मिटींगमध्ये जीभ चावली आहे? नक्कीच. आपण ऑफिसमध्ये मिटींगला बसले असता, काही मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे. आपल्याला ते पटत नाही पण मनात जे वाटत आहे त्याबद्दल १०० टक्के खात्री पण नसते, आणि काहीच मत न मांडता आपण होणाऱ्या निर्णयांना फक्त मान डोलावतो कारण, बोलणारे व माना डोलावनारे इतर लोक मुर्ख नाहीत असे

Read More

निवडीतला विरोधाभास – स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ०१०

निवडीतला विरोधाभास  (Paradox of choices) एकदा मी आईला एका मॉलमध्ये ला घेऊन गेले. भूक लागली म्हणून मी तिला खाद्यपदार्थ सेक्शनला घेऊन गेले. तिथे खाद्यपदार्थांची कमीतकमी ४० दुकाने होती. आणि प्रत्येक दुकानाच्या मेन्यूकार्ड मध्ये १०० तरी पदार्थांची लिस्ट. आईची चिडचिड व्हायला लागली. “आमच्या वेळेस निवड करायला फार फार तर ४ मेन्यू असायचे, जाऊदे मला नको काही

Read More