स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००७ – जन्नत की हुर आणि अच्छे दिन

युट्युबवर ‘जन्नत की हुर’ नावाचा एक व्हिडिओ आहे. एक मौलवी आपल्या भक्तांना सांगतात की, “आज तुम्ही कुरूप बायको, नट्या, प्रेयसी, वेश्या (गंदी, मैली-कुचैली औरतें) यांच्या नादी लागून अल्लाला विसरून जाता, असे करू नका, जर तुम्ही जन्नत मध्ये गेलात तर तुम्हाला अशा अशा मुली ‘वापरायला’ मिळतील की…..म्हणून आत्ता थोडी कळ काढा, त्रास सहन करा आणि पुढे

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००६ – Contrast Effect

बंड्याने घरात खुपच खोड्या काढल्या होत्या. बाबा त्याला खूप रागावले व शुद्धलेखन लिहायची शिक्षा केली. “तू आज खूप दंगा केला आहेस, आज तुला जास्तीचा अभ्यास ही शिक्षा असणार. अगं ए.. ऐकलस का, किती पाने शुद्धलेखन लिहायला सांगू याला?” बाबांनी कामावर जायच्या गडबडीत असलेल्या आईला प्रश्न विचारला. आई म्हणाली, “दहा पाने.” रोज २ पाने लिहायची सवय

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००५ – परस्पर कृतज्ञता 

एकदा मी आणि माझी मैत्रीण भेळ खायला गेलो, खाऊन झाल्यावर तिने आग्रहाने भेळीचे पन्नास रुपये बिल दिले. पुढे आम्ही रात्रीचे जेवण एकत्र घेतले. वेटरने समोर बिल आणून ठेवल्यावर आपसूकच मी ते देण्याचा आग्रह केला व आठशे रुपयांचे बिल आणि वर टीपही दिली. रात्री झोपताना मनात विचार आला की आपला किमान ४२५ रुपयांचा घाटा झाला, भेळचे

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००४ – पुष्टीकरण पूर्वाग्रह ०१

भरतने ठरवलं की आता आपल्याला वजन कमी करायच आहे. भरपूर पैसे खर्च करून त्याने दीक्षित डाएट फॉलो करायला सुरवात केली. वजन कमी करायचं ठरवलेल्या कुठल्याही हौशी व्यक्तीप्रमाणे तो रोज वजन चेक करू लागला. वजन थोडस कमी दिसलं की तो खुश व्हायचा की दीक्षित डाएट काम करत आहे. कधी थोडस वाढलेलं दिसलं की तो स्वत:शी म्हणायचा

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला: भाग ००३ – बुडालेल्या किंमतीचा पाश

रविवारचा दिवस होता, मी पाचशे रुपये मोजून बायकोसोबत चित्रपट पाहायला गेलो. पहिल्या १५ मिनिटात कळून चुकलं की आपला पोपट झालाय, चित्रपट अगदीच बकवास आहे! एक दोन वेळा आळस देऊन मी तीला म्हणालो, “आता बास, अजून पुढे मी काही हे सहन करू शकत नाही.” बायको माझ्याकडे पहात चिडून व हसून म्हणाली, “पाचशे रुपये काय पाण्यात घालायचे

Read More

स्पष्टपणे विचार करण्याची कला भाग ००२ – Survivorship Bias

गावाकडे बी.ए. पास होऊन भरत पहिल्यांदाच पुण्यात आला होता. सदाशिव पेठेत संध्याकाळी फिरताना त्याला तरुणांचे जत्थेच्या जत्थे दिसले. कुणी हातात जाड-जड पुस्तके घेऊन रीडिंग रूमला निघाले आहेत, कुणी चहा पिताना देखील पुस्तक वाचत आहे, कुणी पंचायतराज विषयी चर्चा करत आहेत. काही तरुण बाकड्यांवर बसून एकाग्रपणे गटचर्चा करत आहेत. रस्ता, फुटपाथ, टपऱ्या, बगीचे, मैदाने सगळीकडे उत्साहाने

Read More